आजची वात्रटिका
-------------------------------
विकतचे अनुभव
कालपर्यंत जे जे कडू होते,
तेच आज त्यांचे भिडू आहेत.
लोकांचे राजकीय अनुभव,
आज नको तेवढे कडू आहेत.
लोक तर विकाऊ आहेत,
लोक वेळोवेळी विकले आहेत !
आपल्या कडवट अनुभवातून,
वाटेना लोक काही शिकले आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 74
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
21 जानेवारी 2026

No comments:
Post a Comment