आजची वात्रटिका
-----------------------
अनुकंपा
ते ते तर घडतच राहणार,
जे जे ज्याच्या कर्मात आहे.
राजकीय अनुकंपा योजना,
राजकारणात फॉर्मात आहे.
मागणी तसा पुरवठा,
अनुकंपा योजनेचे सूत्र आहे.
इतिहास असो वा वर्तमान,
हे सार्वकालिक चित्र आहे.
असे होऊच शकत नाही,
मागणीला कधी दाद नाही !
राजकीय अनुकंपा योजनेला,
कोणताही पक्ष अपवाद नाही !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9175
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
30जानेवारी 2026

No comments:
Post a Comment