Thursday, January 1, 2026

नववर्षाचा संकल्प ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
नववर्षाचा संकल्प
जुने वर्ष जायला; नवे वर्ष यायला,
हातामध्ये काही सत्ता लागत नाही.
काही काही महाभाग असे की,
त्यांना कशाचाच पत्ता लागत नाही.
नवे आले काय? जुने गेले काय?
कुणाला काहीच फरक पडत नाही.
नव्या आणि जुन्या वर्षावाचून,
त्यांचे कधीच काही अडत नाही.
जसे कुणी काळाच्या पुढे आहेत,
तसे कुणी काळाच्या मागे आहेत !
किमान त्यांची तरी दखल घेऊ,
जे सदैव नव्यासाठी जागे आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9148
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
1 जानेवारी 2026

 

No comments:

नववर्षाचा संकल्प ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- नववर्षाचा संकल्प जुने वर्ष जायला; नवे वर्ष यायला, हातामध्ये काही सत्ता लागत नाही. काही काही महाभाग अस...