आजची वात्रटिका
-----------------------
ज्याचे त्याचे रंगकाम
ज्याला ज्या पाहिजे त्या रंगात,
लोकांना खुशाल झिंगवून घ्या.
ज्याला ज्या पाहिजे त्या रंगात,
देशाला खुशाल रंगवून घ्या.
एकाने माती खाल्ली म्हणून,
दुसऱ्यानेही माती खाल्ली आहे.
एकमेकांच्या उरावरती,
तुमची रंगवा रंगवी चालली आहे.
तुमच्या राजकीय लढाईमध्ये,
धार्मिकता हीच तुमची ढाल आहे !
तुम्हालासुद्धा माहिती आहे,
सर्वांच्या रक्ताचा रंग लाल आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9170
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
23 जानेवारी 2026

No comments:
Post a Comment