Wednesday, January 21, 2026

वाटा - घाटी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
वाटा - घाटी
एक वेळेस सत्ता मिळविणे सोपे,
पण सत्ता वाटप अवघड होऊन जाते.
सत्ता आपला झटका,
अगदी भल्याभल्यांना देऊन जाते.
कितीही लपवला गेला तरी,
सर्वांचा रुसवा फुगवा दिसला जातो.
कुणी कुणी हाती बंडाचा झेंडा घेऊन,
सरळ दुसऱ्यांच्या गोटात घुसला जातो.
राजकीय माकडचाळे बघून,
दोन बोक्यांची गोष्ट आठवली जाते !
दोघांच्या भांडणांमध्ये मात्र,
सत्ता तिसऱ्याकडूनच पटवली जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9168
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
21 जानेवारी 2026

 

No comments:

विकतचे अनुभव .....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका  ------------------------------- विकतचे अनुभव  कालपर्यंत जे जे कडू होते,  तेच आज त्यांचे भिडू आहेत.  लोकांचे राजकीय अनुभव,  आ...