Sunday, January 4, 2026

परिवर्तनाचा नांगर.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
परिवर्तनाचा नांगर
पुन्हा नव्याने शिवायचे असेल तर,
जे जुने आहे ते उसवावे लागते.
जसे दुधापासून तूप करायचे तर,
दुधाला प्रथम नासवावे लागते.
वरवर चुकीचे दिसले तरी,
परिणाम म्हणून योग्य मानावे लागते.
कुणाच्या दुखावल्या भावना जरी,
शब्दांना कृतीमध्ये आणावे लागते.
कुठवर तण काढीत बसायचे?
चांगल्यासाठी निर्णय घेतला पाहिजे !
जिथे कुठे खुरप्याचे काम नाही,
तिथे सरळ नांगरच घातला पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9151
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
4जानेवारी 2026

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...