आजची वात्रटिका
-----------------------
आपल्या जुन्याच तोफा,
पुन्हा नव्याने उडवल्या जातात.
त्याच त्याच जुन्या मुद्द्यांवरती,
नव्या निवडणुका लढवल्या जातात.
किती निवडणुका आल्या गेल्या ?
मुद्दे मात्र अगदी जसेच्या तसे आहेत.
जनतेच्या गळ्याभोवती,
नव्या जाहीरनाम्यांचे फासे आहेत.
जे काही भूतकाळात झाले,
हेच वर्तमानामध्येही पुन्हा होत आहे!
आपले तरी वेगळे काय होणार?
भविष्यही आपला अंदाज घेत आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9160
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
13 जानेवारी 2026

No comments:
Post a Comment