आजची वात्रटिका
-----------------------
जातीय अस्मिता
जेवढ्या झोकदार झाल्या आहेत,
तेवढ्याच बाकदार झाल्या आहेत.
त्यापेक्षाही जास्त जातीय अस्मिता,
अधिकच टोकदार झाल्या आहेत.
उगीचच कुणालाही रोखले जाते,
उगीचच कुणालाही टोकले जाते.
जातीय अस्मितेच्या नावाखाली,
कुणावरतीही जहर ओकले जाते.
जातीने अस्मिता जोपासली की,
जात जातीला बरी वाटू लागते !
इतरांच्या अस्मिता खोट्या ठरवून,
आपलीच अस्मिता खरी वाटू लागते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9174
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
28 जानेवारी 2026

No comments:
Post a Comment