Monday, January 26, 2026

विसंगती.....साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका


 साप्ताहिक
वात्रटिका
--------------------------------

विसंगती

जे जिंकले त्यांचाही विश्वास बसत नाही,
जे हारले त्यांचाही विश्वास बसत नाही.
जनतेलाही राहून राहून वाटते,
निकालातला कौल आपला दिसत नाही.

आलेले उलट सुलट निकाल बघून,
हल्ली सगळेच कसे कोड्यात आहेत ?
सगळ्यांचे प्रश्नार्थक चेहरे विचारतात,
सांगा कोण कुणाकडून वेड्यात आहेत ?

मतदान यंत्र म्हणाले मार्कर पेनला,
नावडत्याची शाई पुसट पुसट आहे!
काल ज्यांनी एकमेकांचा दुस्वास केला,
आज त्यांचीच नेमकी मोठी घसट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा
वात्रटिका - 70
वर्ष- दुसरे
24जानेवारी 2026

No comments:

विसंगती.....साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका

  साप्ताहिक वात्रटिका -------------------------------- विसंगती जे जिंकले त्यांचाही विश्वास बसत नाही, जे हारले त्यांचाही विश्वास बसत नाही. जन...