आजची वात्रटिका
-----------------------
साहित्य संमेलनामुळे सिद्ध होते,
नेमका साहित्याचा काय दर्जा आहे?
कुणाची प्रेरणा कोणती?
नेमकी कुणाची कोणती ऊर्जा आहे?
जसे साहित्यिक;तसे साहित्य,
अगदी तसेच त्यांचे वाचक आहेत.
संमेलनातील प्रायोजित कार्यक्रम,
सगळ्या सगळ्यांचे सूचक आहेत.
साहित्यपेक्षा साहित्यबाह्य गोष्टींनी,
प्रत्येक साहित्य संमेलन गाजले जाते !
जुने ठराव, नवे सराव होऊन,
साहित्य संमेलनांचे सुप वाजले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9152
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
5 जानेवारी 2026

No comments:
Post a Comment