आजची वात्रटिका
-----------------------
लातूर म्हणाले नांदेडला
आपला राजकीय दुर्दैवविलास,
बघ केवढा वेगाने वाढला आहे.
आपल्याच भूमीमध्ये येऊन,
त्यांनी आपलाच बाप काढला आहे.
राजकीय विलास न समजायला,
आपण काही भोळे शंकर नाहीत.
शोक करण्यासारखी गोष्ट म्हणजे,
आपण पॉलिटिकल अँकर नाहीत.
हातच्या काकणाला आरसा कशाला?
तरी आपली राजकीय उपेक्षा आहे!
प्रचार करावा मात्र अपप्रचार नको,
एवढीच आपली रास्त अपेक्षा आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9155
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
8 जानेवारी 2026

No comments:
Post a Comment