आजची वात्रटिका
-------------------------------
पॉवर मॅजिक
निवडणूकपूर्व वेगळ्या असतात,
निवडणूकोत्तर वेगळ्या असतात.
युत्या असोत किंवा आघाड्या,
अशाच तर सगळ्या असतात.
निवडणूकपूर्व आणि निवडणूकोत्तर,
त्यांच्याकडे त्याचे लॉजिक असते !
खरे सत्य असे की,
ही सगळे पॉवर मॅजिक असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 76
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
24 जानेवारी 2026

No comments:
Post a Comment