Wednesday, January 14, 2026

सब एक है !....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------------
सब एक है !
निवडणूक प्रचारात लागलेली,
त्यांची सगळी भांडणे फेक असतात.
एकदा निवडणूक संपली की,
ते सगळेच्या सगळे एक असतात.
त्यांच्या एकी आणि फेकाफेकीला,
दर निवडणुकीत नवी चमक असते !
त्यांची एकी आणि फेकाफेकीच,
त्यांच्या राजकारणाचे गमक असते !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 69
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
14 जानेवारी 2026

 

No comments:

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...