आजची वात्रटिका
-----------------------
बाजारीकरण
आपण लोकशाहीप्रधान असल्याचा,
दरवेळी आपला आव वाढतो आहे.
निवडणूक कोणतीही असली तरी,
दरवेळी मतदारांचा भाव वाढतो आहे.
लोकशाहीचा मांडला बाजार,
बाजार बसव्यांचा वाव वाढतो आहे.
मतदारांची किंमत तर वाढली पाहिजे,
पण त्याचा बाजारभाव वाढतो आहे.
कुणी विकतो वॉर्ड आणि कॉलनी,
कुणी विकायला गाव काढतो आहे !
कुणाचाच कुणाला विरोध नाही,
बिनविरोधाचा नवा डाव वाढतो आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9173
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
26 जानेवारी 2026

No comments:
Post a Comment