Tuesday, January 13, 2026

भेदभाव....आजची वात्रटिका

 

आजची वात्रटिका
----------------------------
भेदभाव
आरोपी व गुन्हेगारातला फरक,
राजकीय पक्ष सांगू लागले.
परस्परांची राजकीय इज्जत,
जाहीरपणे वेशीला टांगू लागले.
विरोधकांबरोबर जनतेलाही,
त्यांची टोपीवरती टोपी आहे !
इतर पक्षांचा तो गुन्हेगार,
आपला मात्र फक्त आरोपी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 68
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
13 जानेवारी 2026

No comments:

भेदभाव....आजची वात्रटिका

  आजची वात्रटिका ---------------------------- भेदभाव आरोपी व गुन्हेगारातला फरक, राजकीय पक्ष सांगू लागले. परस्परांची राजकीय इज्जत, जाहीरपणे ...