आजची वात्रटिका
-----------------------
प्रायोजित आहेत बातम्या,
प्रायोजित मुलाखती आहेत.
विकतच्या प्रचाराचे प्रकार,
तुम्हीच ओळखा किती आहेत?
जशा प्रायोजित आरत्या आहेत,
तशा प्रायोजित कीर्त्या आहेत.
प्रायोजित उत्सवांमध्ये,
प्रायोजित उत्सवमुर्त्या आहेत.
जेवढे प्रायोजित श्रोते आहेत,
तेवढेच प्रायोजित बघे आहेत !
प्रायोजित कलावंतांकडून,
त्यांच्या प्रचाराचे फुगे आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9154
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
7 जानेवारी 2026

No comments:
Post a Comment