आजची वात्रटिका
-------------------------------
पारंपरिक खंत
एकदा का दुराभिमानाचे वारे,
सुपीक डोक्यात शिरले जाते.
कुणाची केली जाते अवहेलना,
कुणाला दुर्लक्षाने मारले जाते.
दुराभिमान कशाचाही बाळगतात,
दुराभिमानाला कुठे अंत आहे ?
पुन्हा पुन्हा दुराभिमानी सोकावतात,
याचीही पारंपरिक खंत आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 77
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
28 जानेवारी 2026

No comments:
Post a Comment