आजची वात्रटिका
-----------------------
राजकीय शत्रुत्व आणि मित्रत्वाचा,
आपापल्या सोयीने अर्थ असतो.
शत्रुत्व आणि नेतृत्वापेक्षाही,
सर्वात महत्त्वाचा स्वार्थ असतो.
राजकीय शत्रुत्व आणि मित्रत्व,
स्वार्थाभोवती फिरत असते.
कुणी कितीही रगेल असला तरी,
वेळ आली की जिरत असते.
कोण शत्रू आणि कोण मित्र?
त्यांचा त्यांनाही पत्ता लागत नाही!
इथे फक्त वर्तमान महत्त्वाचा असतो,
कुणी भूत आणि भविष्यात जगत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9159
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
12 जानेवारी 2026

No comments:
Post a Comment