आजची वात्रटिका
----------------------------
निष्ठेची ट्वेंटी-ट्वेंटी
पक्षीय निष्ठेची व्याख्या,
दिवसा दिवसाला घटते आहे.
पूर्वी निष्ठा कसोटी वाटायची,
आता ट्वेंटी-ट्वेंटी वाटते आहे.
बदलते राजकारण,
क्रिकेटसारखे गतिमान आहे !
शेवटी रिझल्ट महत्त्वाचा,
बघू नका कोण नीतिमान आहे ?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
आजची वात्रटिका - 75
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
22जानेवारी 2026
No comments:
Post a Comment