Friday, January 16, 2026

पक्क्या शाईची गोष्ट...आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------------
पक्क्या शाईची गोष्ट
मतदान यंत्र म्हणाले शाईला,
शाई गं शाई;तू म्हणे पक्की नाही,
मतदारांच्या बोटावरून निघण्याची,
तुला तर बाई भलतीच घाई.
मार्कर पेन असो व शाई बाटली,
तुझी ओळख तर पक्की आहे !
पराभवाचे खापर तुझ्यावरही फुटणार,
एवढी गोष्ट मात्र नक्की आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 71
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
16 जानेवारी 2026

 

No comments:

पक्क्या शाईची गोष्ट...आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------- पक्क्या शाईची गोष्ट मतदान यंत्र म्हणाले शाईला, शाई गं शाई;तू म्हणे पक्की नाही, मतदारांच्या बो...