Wednesday, January 14, 2026

निलावडणूक म्हणाली निवडणुकी.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
निलावडणूक म्हणाली निवडणुकी
शहरातल्या पक्षीय कार्यकर्त्यांचा,
नको त्यापेक्षा जास्त कचरा झाला.
निवडणूक म्हणाली निवडणुकीला,
चला चला आता खेड्याकडे चला.
नगर आणि महानगरांपेक्षा जास्त,
खेडापाड्यात जास्त गण गण आहे.
गटा - गटाच्या राजकारणामध्ये,
इथेही कार्यकर्त्यांची वणवण आहे.
खेड्यापाड्यातल्या कार्यकर्त्यांसाठी,
खरोखरच आपली सुवार्ता आहे !
शहरातला असो वा खेड्यामधला,
शेवटी कार्यकर्ता तो कार्यकर्ता आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9161
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
14 जानेवारी 2026

 

No comments:

निलावडणूक म्हणाली निवडणुकी.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- निला वडणूक म्हणाली निवडणुकी शहरातल्या पक्षीय कार्यकर्त्यांचा, नको त्यापेक्षा जास्त कचरा झाला. निवडणूक...