Tuesday, September 1, 2026

माकड चेष्टा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
माकड चेष्टा
आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा,
कुणीही कधी हैदोस माजवू नये.
उठता बसता माकडांसमोर,
कुणीही कधी नाक खाजवू नये.
माकडांसमोर नाक खाजवले की,
आपलीच माकडचेष्टा होऊन जाते.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचीही,
उरली सुरली इज्जत घेऊन जाते.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे,
माकडांसाठी तर एक ढाल आहे !
माकडांचा पारंपरिक दावा असतो,
फक्त आमचीच तर लाल आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9385
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
1 सप्टेंबर 2026

 

माकड चेष्टा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- माकड चेष्टा आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, कुणीही कधी हैदोस माजवू नये. उठता बसता माकडांसमोर,...