आजची वात्रटिका
----------------------------
दुष्काळी पाहुणचार
दुष्काळ पाहणी दौरा बघून,
आमचे मतही ठाम झाले.
एकाचा पाहुणचार करताना,
दुसरेच हकनाक बदनाम झाले.
दुसरे बदनाम झाल्याचा,
तिसऱ्याकडूनच दावा आहे.
कोरड्या दुष्काळाच्या स्वागताचा,
खरा साक्षीदार सुकामेवा आहे.
काजू म्हणाला बदामाला,
सत्यही लक्षात आले पाहिजे !
त्यांचे कोरडे वरडे दुःख,
कधीतरी ओले झाले पाहिजे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9405
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
21सप्टेंबर 2026

No comments:
Post a Comment