आजची वात्रटिका
----------------------------
लाचारोत्सव
येथे जेवढे मुजरे आहेत,
तेवढेच येथे हुजरे आहेत.
लाचारीचे महा उत्सव,
सगळ्यांकडून साजरे आहेत.
लाचाराला भेटता लाचार,
लाचारीही लाचारी वाटत नाही.
स्वाभिमानाचा साधा विचारही,
लाचारांना थोडाही पटत नाही.
लाचारांची फौज जमली की,
लाचारीलाही भरती असते !
सगळ्याच लाचारांकडून,
लाचारीचीच आरती असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9386
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
2 सप्टेंबर 2026

No comments:
Post a Comment