Tuesday, January 31, 2023

पक्षीय वाद...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

पक्षीय वाद

राजकीय पक्ष पक्षांचा,
सगळीकडेच वाद आहे.
राजकीय वादविवादाचा
सगळीकडेच नाद आहे.

पक्षीय फटाफुटी नंतर,
ज्याचे त्याचे तोरण आहे.
पक्ष,झेंडा आणि चिन्ह,
हे हुकुमाचे कारण आहे.

जे काल सख्खे होते,
तेच आज सावत्र होतात!
अगदी कट्टर दुश्मनही,
अगदीं जिगरी मित्र होतात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8163
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
31जानेवारी2023
 

पदवीधर शिक्षक निवडणूक ...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------
पदवीधर शिक्षक निवडणूक
कुणाला उमेदवार मिळला नाही,
कुणाला उमेदवार कळला नाही.
गोंधळात गोंधळाचा प्रकार,
कुणाकडूनसुद्धा टळला नाही.
कुणी उमेदवाराची निर्यात केली,
कुणी उमेदवाराची आयात केली !
ते ते त्यांनाच परके ठरले,
ज्यांची जिथे जिथे हयात गेली!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6707
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
31जानेवारी2023

 

Monday, January 30, 2023

भोंदूगिरीच्या टिप्स... मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

--------------------


भोंदूगिरीच्या टिप्स


शक्कल आणि नक्कल जमली की,

तुम्ही बुवा - बाबा झालेच समजा.

भाविक भक्त तयारच असतात,

ते लोटांगणाला आलेच समजा.


शक्कल आणि नकलेसोबत,

अजून काही गोष्टी शिकत चला.

तुम्ही कानफाटके असला तरी,

भक्तांचे कान नेहमी फुकत चला.


किर्तन आणि सत्संगाचे फड,

सगळीकडे जोरात रंगवत चला!

भक्तांची नशा उतरूच नये,

भक्तांना झिंग झिंग झिंगवत चला!!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

मोबाईल-9923847269

---------------------------------------

फेरफटका-8162

दैनिक झुंजार नेता

वर्ष -23वे

30जानेवारी2023

----------------------------------

मराठी वात्रटिका

*विशेष सूचना-*

1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करा.

२)सदरील वात्रटिकमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला कळवा.

३) वैयक्तिक अभिप्रायाचे स्वागत.

जे वात्रटिका शेअर करत आहेत त्यांचे विशेष आभार.

4) माझ्या प्रसिद्ध असलेल्या 18 हजारांपेक्षा जास्त वात्रटिका 8 हजार पेक्षा जास्त वात्रटिका एका क्लिकवर वाचू शकता

https://suryakantdolase.blogspot.com/?m=1

५) माझ्या बाल वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा

https://balsuryakanti.blogspot.com

६) सर्व काही एकाच ठिकाणी...एकाच ठिकाणी !! अर्थात *सप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com

7) माझ्या *सूर्यकांती लाईव्ह* किंवा यूट्यूब चॅनलला कृपया भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase

8 )आजपर्यंतचे सर्व वात्रटिका संग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

https://vatratikaebooks.blogspot.com

९)माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा

https://surykanti.blogspot.com

१०) माझ्या विडंबन कविता वाचण्यासाठी किलक करा

https://suryakanti1.blogspot.com

-सूर्यकांत डोळसे

 30जानेवारी2023

धिरेंद्रलीला...मराठी वात्रटिका

 आजची वात्रटिका
--------------------

धिरेंद्रलीला

एकदा नाही;दोनदा नाही,
हा प्रकार वारंवार आहे.
वादविवादाच्या भोवऱ्यात,
बागेश्वरचा दिव्य दरबार आहे.

चमत्काराला नमस्कार होतो,
टिंगलीसोबत टवाळी आहे.
जणू बालाजीच्या कृपेने,
स्वामीची जीभ लव्हाळी आहे.

अहंकाराची ओलांडली सीमा,
प्रत्येक शब्दा- शब्दात दंभ आहे!
भक्तांच्या वेड्या भक्तीवर,
बाबाची उलटी बोंबा बोंब आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6706
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
30जानेवारी2023
 

Sunday, January 29, 2023

आंधळे समर्थन...आंधळे समर्थन

आजची वात्रटिका
----------------------

आंधळे समर्थन

गुरु कितीही चुकला तरी,
भक्तांना चुकल्यासारखे वाटत नाही.
गुरु काहीही बकला तरी,
भक्तांना बकल्यासारखे वाटत नाही.

भाविक भक्तांची आंधळी भक्ती,
हीच गुरूंची खरी शक्ती असते.
गुरुच्या आंधळ्या समर्थनाची,
आंधळ्या भक्तांवर सक्ती असते.

यामुळेच बाबा बुवांचे पापही,
आंधळ्या भक्तांना मोठे पुण्य वाटते !
तुरुंगातल्यांचेही समर्थन करताना,
आंधधळ्या भक्तांना मोठे धन्य वाटते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8161
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
29जानेवारी2023
 

दुःखद न्याय...आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

दुःखद न्याय

लोकांनी निवडून दिल्याचा,
ते गैरफायदा घेत आहेत.
न्यायदानाच्या नावाखाली,
ते हाती कायदा घेत आहेत.

ही कायद्याची टिंगल नाही तर,
तुम्हीच सांगा दुसरे काय आहे?
ते घालतात उघड धुडगूस,
त्यांच्या दृष्टीने हाच न्याय आहे.

त्यांना सत्तेची असते मस्ती,
त्यामुळे हिरोगिरीची हुक्की येते!
लोकांकडून होतो उदो उदो,
लोकशाही मात्र दुःखी होते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6705
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
29जानेवारी2023
 

Saturday, January 28, 2023

परीक्षेपे चर्चा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------

परीक्षेपे चर्चा

कुणीकडून कुणीकडे,
मोर्चावर मोर्चा आहे.
चहापासून परीक्षेपर्यंत,
चर्चा एके चर्चा आहे.

दिल्लीपासून गल्लीपर्यंत,
चर्चेला रंग चढले.
प्रश्नांच्या चौकारावर,
उत्तरांचे षटकार पडले.

कुठे भक्ती कामी आली,
कुठे सक्ती कामी आली!
परीक्षेचा मूलमंत्र देताना,
खरी युक्ती कामी आली!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-8160
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
28जानेवारी2023
 

राजकीय सेतू....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------

राजकीय सेतू

कुणाच्या मागे वंचित आहे,
कुणाच्या मागे संचित आहे.
वंचित आणि संचितमध्ये.
फरक अगदी किंचित आहे.

जसा कुणी स्वयंप्रकाशी आहे,
तसा कुणी परप्रकाशी आहे.
जशी कुणाची नजर पायाशी,
तशी कुणाची आकाशी आहे.

जसा यांचा एक हेतू आहे,
तसा त्यांचा एक हेतू आहे!
आजोबांपासून नातवांपर्यंत,
नवा राजकीय सेतू आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6704
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
28जानेवारी2023
 

Thursday, January 26, 2023

कारण इथे प्रजेचे राज्य आहे...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
कारण इथे प्रजेचे राज्य आहे
हैदोस आणि स्वैराचाराला,
इथला प्रत्येक जण सज्ज आहे.
इथे कुणाला भितो कोण?
कारण इथे प्रजेचे राज्य आहे.
प्रांतांचे प्रांतांना पडलेले,
आपापला जाती धर्म पूज्य आहे.
इथे देशापेक्षा जो तो मोठा,
कारण इथे प्रजेचे राज्य आहे.
क्षुल्लक गोष्टी अस्मिता झाल्या,
इथे राष्ट्रभावनाही त्याज्य आहे.
मग भावना कोमल होणारच,
कारण इथे प्रजेचे राज्य आहे.
हक्कांसाठी जो तो भांडतो,
कर्तव्य भावना लाज्य आहे.
आधी पोटोबा, मग खेटोबा,
कारण इथे प्रजेचे राज्य आहे.
अन्यायी अत्याचारी शिरजोर,
जो आरोपी, तोच जज्ज आहे.
न्यायव्यवस्थेला मोजतो कोण?
कारण इथे प्रजेचे राज्य आहे.
जो तो एकमेकांची खाजवतो
इथले राजकारण खाज्य आहे!
घटना - बिटना मानतो कोण?
कारण इथे प्रजेचे राज्य आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6703
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
26जानेवारी2023

 

ऑफिशियल संस्कृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

ऑफिशियल संस्कृती

कार्य तत्परतेची संस्कृती,
अजूनही इथे रुजली नाही.
अशी एकही फाईल नसेल,
जी ऑफिसात कुजली नाही.

फाईल सडवली अडवली जाते,
कधी कधी फाईल दडवली जाते.
भ्रष्टाचाराच्या किड्यांकडून,
संपूर्ण यंत्रणा सडवली जाते.

सडवणूक आणि अडवणूक,
ही ऑफिशियल संस्कृती आहे!
मुक स्वीकृती देत देत,
विकृतीच्या जोडीला विकृती आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8159
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
26जानेवारी2023
 

Wednesday, January 25, 2023

स्वार्थी विकास....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

स्वार्थी विकास

खेड्यापाड्यातला भारत,
विकासाची प्रतीक्षा करतो आहे.
महानगरांच्या महामार्गावरून,
विकास मात्र ऐटीत फिरतो आहे.

चमचामाट आणि घमघमाट,
याच्यातच विकास अडकला आहे.
खेड्यापाड्यांना बायपास करीत,
विकासाचा झेंडा फडकला आहे.

खेड्याकडे चला, खेड्याकडे चला,
असे विकासाला विनवावे लागेल!
नसता शहरी विकासालाही,
स्वार्थी म्हणून हिनवावे लागेल!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6702
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
25जानेवारी2023
 

Tuesday, January 24, 2023

सत्यप्रिय...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

सत्यप्रिय

सत्यवादी व्हा; सत्यवेधी व्हा,
मिथ्यत्यागी व्हा;सत्ययोगी व्हा.
सत्यप्रकाश व्हा;सत्य आकाश व्हा,
सत्यजोगी व्हा;सत्यभोगी व्हा.

सत्यमान व्हा;सत्यवान व्हा,
सत्य असे भिनले पाहिजे!
तुमच्या शत्रू असला तरी,
त्याने तुम्हांस मानले पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
फेरफटका-8158
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
24जानेवारी2023
 

बाळासाहेबांचे तैलचित्र..आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बाळासाहेबांचे तैलचित्र

ऐलचित्र लागले,पैलचित्र लागले,
उशिरा का होईना तैलचित्र लागले.
जसे अत्र जागले;तसे तत्र जागले,
विधानभवनासह सर्वत्र जागले.

कुणासाठी तो ऑइल पेंट आहे,
कुणाला पॉलिटिकल सेंट आहे!
बाळासाहेबांच्या ठाकरी विचाराला,
हेच खरे पोएट्रिक जजमेंट आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6701
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
24जानेवारी2023
 

Monday, January 23, 2023

दिव्य दरबार.....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------------

दिव्य दरबार

जसे गुरु दिव्य आहेत,
तसे भक्तही दिव्य आहेत.
दरबारातील बाबांचे प्रताप,
खरोखरच श्राव्य आहेत.

भक्तांना वाटू लागते,
ही तर बाबांची लीला आहे.
खरे तर भक्तांबरोबर,
बाबांचा स्क्रू ढिला आहे.

कशाला देवेंद्र पाहिजे?
कशाला नरेंद्र पाहिजे?
देशाच्या उद्धारासाठी,
गल्लोगल्ली धिरेंद्र पाहिजे!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8157
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
23जानेवारी2023
 

कुस्त्यांची दंगल....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

कुस्त्यांची दंगल

जिकडे बघावे तिकडे,
सध्या कुस्त्यांची दंगल आहे.
कुणी कसा विश्वास ठेवावा?
सगळेच काही मंगल आहे?

कुणी लंगोट कसला आहे,
कुणी लंगोट टाकला आहे.
बोलक्या ढोलक्या मल्लांनी,
नाहक शड्डू ठोकला आहे.

आरोप प्रत्यारोपांची तोफ,
जोरजोरात धडाडते आहे!
अन्याय अत्याचाराच्या विरोधात,
हलगी जोरात कडाडते आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6700
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
23जानेवारी2023
 

Sunday, January 22, 2023

आतला आवाज....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

आतला आवाज

जसे प्रतिष्ठेच्या अहंकारामुळे,
ठेंगता आणि रांगता येत नाही.
तसे सहन होत नसले तरी,
मनातले काही सांगता येत नाही.

मनातले बंड; मनातच थंड,
तरीही अहंगंड आडवा येतो !
वरवर गोड वाटले तरीही,
आतला आवाज कडवा होतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8156
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
22जानेवारी2023
 

ब्रेकअपचा योगायोग...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

ब्रेकअपचा योगायोग

त्यांची चालली खेचाखेच,
त्याचा आपल्याला ताण आहे.
ताणलेल्या धनुष्याल बोलतो,
तो तर वैतागलेला बाण आहे.

वेट अँड वॉचपेक्षा;
बाणा, दुसरे काय बेटर आहे?
उगीच दोरीचा साप नको,
जे आज तरी कोर्ट मॅटर आहे!

टोकदार शब्दात बाण उत्तराला,
ज्याच्या त्याच्या कर्माचा भोग आहे!
दुर्दैवाने आपल्या ब्रेक अपला,
व्हॅलेंटाईन डे चा प्रेमयोग आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6699
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
22जानेवारी2023
 

Saturday, January 21, 2023

दांभिकतेची झाकापाक...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

दांभिकतेची झाकापाक

फसवा फसवी;गंडवा गंडवी,
असे प्रकार खुलेआम होतात.
दांभिकता उघडी पाडली की,
म्हणे धर्म बदनाम होतात.

धर्म बदनाम होऊ नयेत म्हणून,
दांभिकांची पाठराखण असते.
अंधश्रद्धेच्या नंगानाचाला,
श्रद्धेचे हुकमी झाकण असते.

समर्थनाशिवाय दांभिकता,
फोपावलीच जाऊ शकत नाही!
उघड्याकडून नागड्याची,
कितीही झाकली तरी झाकत नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6698
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
21जानेवारी2023
 

ब्रेकअपची शिक्षा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

ब्रेकअपची शिक्षा

कालच्या प्रेमप्रकरणाचे,
आज जाहीर डफडे आहे.
ब्रेकअप केलेल्यांच्या मागे,
चौकशीचे लफडे आहे.

कशात काय आहे?
हा लफड्यात पाय आहे!
जो जो शरण आला,
त्याला चौकशीतून बाय आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8155
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
21जानेवारी2023
 

Friday, January 20, 2023

निवडणूक पूर्वसूचना...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

निवडणूक पूर्वसूचना

उद्घाटन आणि भूमिपूजन,
ही इलेक्शनची सूचना असते.
भीक नको पण कुत्रे आवरा,
मतदारराजाची याचना असते.

कोनशिलेवर कोनशिला,
नारळावर नारळ फुटला जातो.
टीका आणि टिकावाच्या घावांनी,
प्रचाराचा आनंद लुटला जातो.

झेंडे,दांडे आणि गोंडे बदलून,
हेच कार्यक्रम राबवले जातात!
जणू एकाच कोंबडीखाली,
आपापले अंडे उबवले जातात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6697
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
20जानेवारी2023
 

सिम्बॉलिक संवाद...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

सिम्बॉलिक संवाद

चिन्ह म्हणाले चिन्हाला;
आपले चिन्ह काही खरे नाही.
राजकीय पक्षांच्या भांडणात,
आपल्याला गोठवणे बरे नाही.

राजकीय उत्तरे शोधण्यात,
आपल्यावरच प्रश्नचिन्ह आहे.
गोठविण्याच्या बातम्यांमुळे,
आपला प्रत्येकजण सुन्न आहे.

आपण फक्त निमित्तमात्र,
उपयोगी ज्याचे त्याचे कर्तब आहे!
शेवटी आपणच दाबले जातो,
याच्यावरती शिक्कामोर्तब आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8154
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
20जानेवारी2023
 

Thursday, January 19, 2023

डोमकावळे...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------
डोमकावळे
लोक हे लोकच असतात
तोंडाला हात लावता येत नाही.
तुम्ही संधी दिल्याशिवाय काही,
लोकांना मुळी फावता येत नाही.
आयत्या संधीमुळेच तर,
सारे डोमकावळे सोकू लागतात!
असली नसलेली सगळी गरळ,
कावळे ओक ओक ओकू लागतात!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8153
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
19जानेवारी2023

 

ग्रुपीझम...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

ग्रुपीझम

समाजातील वाढत्या कट्टरतेचे,
जिकडे बघावे तिकडे प्रूफ आहेत.
सोशल मीडियावर नीट बघाल तर,
जाती उपजातीचेही ग्रुप आहेत.

जाती- पाती जवळ आल्या,
कट्टर धार्मिकांचेही ग्रुप आहेत.
खरे आहेत;खोटे आहेत,
थोडक्यात काय तर खूप आहेत.

याचा अर्थ मुळीच असा नाही,
आपली एकी कुणाला दिसू नये!
संघटन जसे विधायक असावे,
तसे संघटन विध्वंसक असू नये!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6696
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
19जानेवारी2023
 

Wednesday, January 18, 2023

रिमोट वोटिंग

आजची वात्रटिका
-----------------------------

रिमोट वोटिंग

भारतीय मतदारांच्या नशीब
आणखी एक नवा योग आहे.
निवडणूक आयोगाकडून,
रिमोट वोटिंगचा प्रयोग आहे.

मतदानाचा टक्का वाढणार का?
पुन्हा न सुटलेले कोडे आहे !
ईव्हीएमचे झाले थोडे,
त्यात रिमोट वोटिंगचे घोडे आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8152
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
18जानेवारी2023
 

विकृतीची स्वीकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

विकृतीची स्वीकृती

मुजोरी आणि मस्तवालपणा,
किती ऐटीत जपला जातो?
वाढदिवसाचा केकसुद्धा,
थेट तलवारीने कापला जातो.

कायदा आणि सुव्यवस्थेचे,
हे टवाळ जणू हाडवैरी असतात.
कधी नाचवतात तलवारी,
कधी बंदुकीच्या फैरी असतात.

मौज,मस्ती आणि धुंदीमुळे,
पार्टीला रंग चढत जातो!
विकृतीला मिळते स्वीकृती,
म्हणूनच नंगानाच वाढत जातो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6695
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
18जानेवारी2023
 

Tuesday, January 17, 2023

बंडार्थ...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------------

बंडार्थ

ज्याच्या त्याच्या जीवाला,
एका संधीचा घोर असतो.
म्हणूनच कालचा निष्ठावंत,
आज मात्र बंडखोर असतो.

बंडखोरांची बंडखोरांशी,
आपोआप गाठ पडत असत!
सहनशीलतेच्या गाळात,
निष्ठा सड सड सडत असते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8152
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
17जानेवारी2023
 

अवसानघातकी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------------

अवसानघातकी

लढायांच्या वलग्ना करणे,
हे शेंदाड शिपायांचे काम नाही.
आणला लढाईचा आव जरी,
त्यामध्ये कसलाच राम नाही.

पाजळली उजळली शस्त्रे जरी,
त्यांना पाहिजे ती धार नसते.
ऐनवेळी रणांगण सोडून पळणे,
हेच त्यांच्या लढाईचे सार असते.

बोलविते धनी दुसरे असले की,
त्यांना मग तहाचाही मोह असतो!
यातली दाहक सच्चाई अशी की,
हा लुच्चांचा लुच्चांना शह असतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6694
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
17जानेवारी2023
 

Monday, January 16, 2023

घुसमट....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------------
घुसमट
जसा नेहमीच पक्षाला नेता असतो,
तसा कधी कधी नेता हाच पक्ष होतो,
सगळा पक्षीय प्रोटोकॉल,
गटातटाच्या राजकारणात भक्ष्य होतो.
मगच राजकीय पक्षा-पक्षामध्ये,
कुणाकुणाचा श्वास घुसमटू लागतो!
गटातटाच्या राजकारणात,
मग आपलाच नेता पक्ष वाटू लागतो!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8151
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
16जानेवारी2023
---------------------------------------
मराठी वात्रटिका

उचलेगिरी....मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
---------------------------

उचलेगिरी

कुणाचीही घागर,
कुणाच्याही नळाला आहे.
जो मिळेल तो उमेदवार,
आपापल्या गळाला आहे.

जो हळद लावून तयार,
त्याला बरोबर टिपले आहे.
रेडीमेड नवरदेवाला,
बाशिंग फक्त आपले आहे.

जणू नकटीच्या लग्नाला,
विघ्नामागे विघ्न आहे!
विश्वासाबरोबे निष्ठाही,
अगदी राजरोस नग्न आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6693
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
16जानेवारी2023
 

Sunday, January 15, 2023

समन्वयाचे मायाजाल....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

समन्वयाचे मायाजाल

कालच्यात आणि आजच्यात,
नेमका फरक काय झाला?
जशी हातातली सत्ता गेली,
तसा सत्तेबरोबरच समन्वय गेला.

आघाड्यामधला समन्वय,
निमताळा आणि चवचाल असतो!
याहूनही पुढे जाऊन सांगायचे तर,
समन्वय म्हणजे मायाजाल असतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6692
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
15जानेवारी2023
 

Saturday, January 14, 2023

जनरेशन गॅप...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

जनरेशन गॅप

खऱ्या राजकीय वारसदारांची,
जणू हनुमानापेक्षा मोठी उडी आहे.
कालची पिढी एका पक्षात होती,
दुसऱ्या पक्षात आजची पिढी आहे.

वारसदारांच्या हनुमान उड्याचा,
पक्षाला पक्षाला मोठा ताप आहे!
नवी पिढी कारणे सांगू लागली,
हाच खरा जनरेशन गॅप आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8149
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
14जानेवारी2023
 

डाग....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------------

डाग

कुणाचे राजकारण गहन,
कुणाचे राजकारण उथळ आहे.
तांब्याने सांगायची गरज नाही,
किती जस्त?किती पितळ आहे ?

सत्यालाही असत्याचा,
इथे नको तेवढा हेवा आहे!
आपले पितळ उघडे पडूनही,
इथे चोवीस कॅरेटचा दावा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6691
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
14जानेवारी2023
 

Friday, January 13, 2023

पुरस्कारांची दुनिया...मराठी वात्रटिका

स्त्री-पुरुष असमानता

जो बायकोच्या डोक्याने चालतो,
त्याला बाईलबुद्ध्या म्हटले जाते.
जी नवऱ्याच्या इशाऱ्यावर चालते,
तिला पातिव्रत्याचे पुण्य भेटले जाते.

जर स्त्री आणि पुरुष,
असा भेदभाव कधीच झाला नसता!
तर कदाचित ' बाईलबुद्ध ' साठी,
विरुद्धार्थी शब्द जन्माला आला असता!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8148
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
13जानेवारी2023

पुरस्कारांची दुनिया...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

पुरस्कारांची दुनिया

ज्याला पुरस्कार मिळत नाही,
तो भलताच व्हायबल आहे.
गल्ली-बोळातल्या पुरस्कारांनाही,
हल्ली मोठ मोठाले लेबल आहे.

राज्य सोडा,देश सोडा,
जागतिक पुरस्कार मिळू शकतो.
उतावळ्याबरोबर बावळाही,
पुरस्कारांवरती भाळू शकतो.

पुरस्कारांची दुनिया अशी,
प्रचंड हसवी आणि फसवी आहे!
जेवढा पतीव्रतेचा आणते आव,
तेवढीच ती बाजारबसवी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6690
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
13जानेवारी2023
 

Thursday, January 12, 2023

तारुण्याचे कारुण्य...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

तारुण्याचे कारुण्य

मोठी नाजूक अवस्था,
चेहराही करुण आहे
बर्थ सर्टीफिकेट सांगते,
म्हणून तो तरुण आहे.

काही तरुण म्हातारे,
काही तरुण बालिश आहेत.
जे काही चकाकते आहेत,
ते सर्व तरुण पॉलिश आहेत.

आपल्या आतले तारुण्य,
शेवटपर्यंत पुरले पाहिजे !
आपण झुरे ठरण्याऐवजी,
जग आपल्यावर झुरले पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8147
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
12जानेवारी2023
 

जिजाऊ शपथ सांगतो...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

जिजाऊ शपथ सांगतो

तुम्ही मॉम आणि मम्मा झालात,
बापाचाही डॅडा करून ठेवला आहे.
आधुनिकतेच्या हौसेपोटी,
भलताच राडा करून ठेवला आहे.

सुविधा आल्या,सुबत्ता आली,
सुसंस्कार मात्र हरवत चालले आहेत.
सिमेंटच्या बंगल्याभोवती,
संस्कारकेंद्र मिरवत चालले आहेत.

डॅडा व्हा, मम्मा व्हा,मम्मी व्हा,
यापुढेही अजून काय काय व्हा !
त्याअगोदर तुम्ही तुमच्या लेकारांचे,
फक्त संस्कारी बाप आणि माय व्हा!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6689
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
12जानेवारी2023
 

Wednesday, January 11, 2023

उपटसुंभ...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

उपटसुंभ

इकडेही उपटसुंभ आहे,
तिकडेही उपटसुंभ आहे.
जिकडे बघावे तिकडे,
सर्वत्र सारखीच बोंब आहे.

ते आपला खुटा उपटतात,
आपण त्यांना निपटू शकत नाही.
उपटसुंभांचा गोड गैरसमज,
कुणी काहीच उपटू शकत नाही.

आपण उपटसूळ असल्यानेच,
आपण उपटसुंभ सोसले आहेत!
दर पाच वर्षाला होते चूक,
त्यामुळेच उपटसुंभ पोसले आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8146
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
11जानेवारी2023
 

षंढांचे षडयंत्र...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

षंढांचे षडयंत्र

तुम्ही नडलात,तुम्ही भिडालात,
ते बदनामीचा शह देवू शकतात.
तरीही तुम्ही पुरून उरलात तर,
मग कट-कारस्थानं होवू शकतात.

ते कसले बोडख्याचे चतुर?
ते काटा काढायला आतूर असतात.
त्यांचे हस्तक आणि मस्तक,
आपलेच जळके फितूर असतात.

ते उथळ असले तरी,
त्यांचे विषय मात्र खूप खोल आहेत!
आमच्यासारखे अनुभवी सांगतील,
हे तर अनुभवाचेच बोल आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6688
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
11जानेवारी2023
 

Tuesday, January 10, 2023

सत्तेचे कोर्ट मॅटर...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------
सत्तेचे कोर्ट मॅटर
जनतेच्या कोर्टातून खऱ्या कोर्टात,
सत्तेचा संघर्ष जाम अडकला आहे.
तारीख पे तारीख होत असल्याने,
सत्ता संघर्ष पुन्हा भडकला आहे.
नको ते दळण दळून दळून,
लोकमताचे भुस्काट पडले आहे!
सत्ता संघर्ष न्यायप्रविष्ट असल्याने,
सगळ्यांचेच मुस्काट पडले आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8145
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
10जानेवारी2023

 

थंडीची नशा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

थंडीची नशा

नाका तोंडात वारा असतो,
घसरलेला पारा असतो.
आला थंडीचा महिना sss
गारठवणारा नारा असतो.

कुठे थंडी भाजली जाते,
कुठे थंडी शिजली जाते.
ज्याचा होतो निरुपाय,
त्यालाच थंडी वाजली जाते.

कपामुळे वाफाळते बशी,
बाटलीला बाटली भिडली जाते !
आगीने आग वाढत जाऊन,
थंडीलाही नशा चढली जाते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6687
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
10जानेवारी2023
 

Monday, January 9, 2023

चित्रा विरुद्ध रूपाली...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

चित्रा विरुद्ध रूपाली

उर्फीचे अंगप्रदर्शन बघून,
ऊर फोडून घेवू लागल्या.
उर्फी राहिली बाजूला,
ह्याच लढून घेवू लागल्या.

काय घालावे?काय बोलावे?
हा व्यक्तिगत मामला आहे!
ओंगळवाने प्रदर्शन बघून,
महाराष्ट्र पुरता दमला आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8144
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
9जानेवारी2023
 

विस्ताराचा गुळणा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

विस्ताराचा गुळणा

बंडखोरांच्या तोंडातून फुटलेला,
मंत्रिमंडळ विस्ताराचा गुळणा आहे.
एक दिलाने,एक सुराने,
मंत्रिमंडळ विस्ताराचा पाळणा आहे.

विस्ताराच्या पाळण्याची दोरी,
सर्वच बंडखोरांना खूप जाचत आहे !
कुणाचा चालला थयथयाट,
कुणी मनातल्या मनात नाचत आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6686
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
9जानेवारी2023
 

Sunday, January 8, 2023

सैनिकी वाटचाल...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

सैनिकी वाटचाल

या गटातून त्या गटात,
सैनिकांचे स्थलांतर आहे.
उघड सांगायचे तर,
हे सेनेचे बलांतर आहे.

स्थलांतर ते बलांतर,
अशी सेनेची वाताहत आहे!
एक नाथी,एक हाती,
आता सेनेची पत आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8143
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
8जानेवारी2023
 

गुंडास महागुंड...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

गुंडास महागुंड

कुणी म्हणे गुंड आहे,
कुणी म्हणे महागुंड आहे.
लोकांना ते षंढ मानतात,
कारण जनता महाथंड आहे.

जशी गुंडागर्दीची नशा आहे,
तशी गर्मी आणि गुर्मी आहे !
गुंडात आणि महागुंडात,
सगळेच समानधर्मी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6685
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
8जानेवारी2023
 

Saturday, January 7, 2023

गांडूळांनो....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

गांडूळांनो....

तुमच्या बुळंगेपणामुळेच,
कपटी लोकांचे पावले जाते.
जसे मासे पकडण्यासाठी,
गाडूळांना गळाला लावले जाते.

डोळ्यांचा तर पत्ता नाही,
कपाळी दुतोंडीपणाचा शाप आहे!
गांडूळांनो तुमचा गांडूळपणा,
तुमच्या लायकीचे माप आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8142
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
7जानेवारी2023
 

नंगानाच...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

नंगानाच

कुणाचे खाणे,पिणे,गाणे,
कुणाचे लफडे,कपडे जाचू लागले.
व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली,
कुणी कुणी तर नागवे नाचू लागले.

कुणाच्या धर्मावर,कुणाच्या कर्मावर,
कुणाच्या वर्मावरती घाव आहे.
या सगळ्याच थयथयाटाला,
फक्त नंगानाच हेच एक नाव आहे.

कुणाला गोत्यात कसे आणावे?
याकडेच प्रत्येकाचे डोळे आहेत !
जे परस्परांसमोर नाक खाजवतात,
त्या सर्वांचे हे माकडचाळे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6684
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
7जानेवारी2023
 

Friday, January 6, 2023

बेजबाबदारीचा गुत्ता...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

बेजबाबदारीचा गुत्ता

हल्ली जबाबदारांनाच,
बेजबाबदार म्हटले जाते.
बेजबाबदारीचा कळस बघून,
आपले डोके उठले जाते.

जणू त्यांच्याकडेच,
बेजबाबदारीचा गुत्ता असतो!
आपले डोके उठले तरी,
त्यांना डोक्याचा पत्ता नसतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8141
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
6जानेवारी2023
 

मोबाईल जर्नलिझम...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

मोबाईल जर्नलिझम

नैतिकता,विश्वासार्हता वगैरे वगैरे,
सगळीच्या सगळी बंधने सैल झाली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून,
बंदिस्त पत्रकारिता मोबाईल झाली.

सिटीझन्स झाले नेटिझन्स,
फारसे कुणी वेटिझन्स उरले नाहीत.
फाईव्ह जी आ वासून उभे,
तरी काळाची पावले हेरले नाहीत.

ओल्ड इस गोल्ड असले तरी,
ते आता फारसे सोल्ड होत नाही!
जो काळाचे अमृत प्याला,
फक्त तोच कधी ओल्ड होत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6683
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
6जानेवारी2023
 

Thursday, January 5, 2023

नासका आनंद...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

नासका आनंद

एक नासका आंबा अढी नासवतो,
हा दावा शंभर टक्के फुसका आहे.
अढी नासते याचे खरे कारण,
प्रत्येक आंबा आतून नासका आहे.

नासक्याला नासके भेटतात,
तेंव्हाच अढीची खरी वाट लागते !
नासक्यांना मिळतो नासका आनंद,
इतरांच्या खिशाला चाट लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8140
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
5जानेवारी2023
 

नॉनस्टॉप प्रोग्राम...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

नॉनस्टॉप प्रोग्राम

बारा महिने तेरा त्रिकाळ,
राजीनाम्याच्या मागण्या असतात.
बारा महिने तेरा त्रिकाळ,
तापलेल्या डागण्या असतात.

राजीनामा मागणीच्या डागणीने,
सतत राजकारण तापवले जाते!
एकदा साटेलोटे झाले की,
त्यांना जे वाटेल ते खपवले जाते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6682
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
5जानेवारी2023
 

उमेदवारीचे मायाजाल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उमेदवारीचे मायाजाल कोणत्याही निवडणुकीमध्ये, एक चालूपणा नक्की केला जातो. नाव सारखे असणारा उमेदवार, ...