Saturday, January 28, 2023

राजकीय सेतू....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------

राजकीय सेतू

कुणाच्या मागे वंचित आहे,
कुणाच्या मागे संचित आहे.
वंचित आणि संचितमध्ये.
फरक अगदी किंचित आहे.

जसा कुणी स्वयंप्रकाशी आहे,
तसा कुणी परप्रकाशी आहे.
जशी कुणाची नजर पायाशी,
तशी कुणाची आकाशी आहे.

जसा यांचा एक हेतू आहे,
तसा त्यांचा एक हेतू आहे!
आजोबांपासून नातवांपर्यंत,
नवा राजकीय सेतू आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6704
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
28जानेवारी2023
 

No comments:

निक वात्रटिका l 30जानेवारी 2025वर्ष- चौथेअंक - 242 वा l पाने -51

निक वात्रटिका l 30जानेवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 242 वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1oGrImezRzlVp9jRZc0dM...