Tuesday, January 3, 2023

सावित्रीची आण...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

सावित्रीची आण

तुला मान आहे, पान आहे,
सगळे कसे छान छान आहे.
म्हणूनच गं आई..बाई..
तुला आई सावित्रीची आण आहे.

तुला वास्तवाचे भान आहे,
तुला वास्तवाची जाण आहे.
चुकून विसरली,चुकून घसरली,
तुला आई सावित्रीची आण आहे.

ओठात हवी,पोटात हवी,
याचे तुला आत्मभान आहे.
सावित्री रुजव,सावित्री जोजव,
तुला आई सावित्रीची आण आहे.

अबबलेची तू सबला झालीस,
शक्ती आणि मुक्तीचे वाण आहे.
सावित्रीचा वारसा आरसा हो,
तुला आई सावित्रीची आण आहे.

भूत वेगळे,भविष्य वेगळे,
हातात तुझ्या वर्तमान आहे !
सावित्री घडव, सावित्री मढव,
तुला आई सावित्रीची आण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6680
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
3जानेवारी2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...