Thursday, January 26, 2023

ऑफिशियल संस्कृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

ऑफिशियल संस्कृती

कार्य तत्परतेची संस्कृती,
अजूनही इथे रुजली नाही.
अशी एकही फाईल नसेल,
जी ऑफिसात कुजली नाही.

फाईल सडवली अडवली जाते,
कधी कधी फाईल दडवली जाते.
भ्रष्टाचाराच्या किड्यांकडून,
संपूर्ण यंत्रणा सडवली जाते.

सडवणूक आणि अडवणूक,
ही ऑफिशियल संस्कृती आहे!
मुक स्वीकृती देत देत,
विकृतीच्या जोडीला विकृती आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8159
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
26जानेवारी2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका26फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे..अंक -264वा

दैनिक वात्रटिका 26फेब्रुवारी2024....वर्ष- तिसरे.. अंक -264वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1mqkcNOoIdypEM3GO2...