Tuesday, January 17, 2023

अवसानघातकी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------------

अवसानघातकी

लढायांच्या वलग्ना करणे,
हे शेंदाड शिपायांचे काम नाही.
आणला लढाईचा आव जरी,
त्यामध्ये कसलाच राम नाही.

पाजळली उजळली शस्त्रे जरी,
त्यांना पाहिजे ती धार नसते.
ऐनवेळी रणांगण सोडून पळणे,
हेच त्यांच्या लढाईचे सार असते.

बोलविते धनी दुसरे असले की,
त्यांना मग तहाचाही मोह असतो!
यातली दाहक सच्चाई अशी की,
हा लुच्चांचा लुच्चांना शह असतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6694
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
17जानेवारी2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...