Friday, January 20, 2023

सिम्बॉलिक संवाद...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

सिम्बॉलिक संवाद

चिन्ह म्हणाले चिन्हाला;
आपले चिन्ह काही खरे नाही.
राजकीय पक्षांच्या भांडणात,
आपल्याला गोठवणे बरे नाही.

राजकीय उत्तरे शोधण्यात,
आपल्यावरच प्रश्नचिन्ह आहे.
गोठविण्याच्या बातम्यांमुळे,
आपला प्रत्येकजण सुन्न आहे.

आपण फक्त निमित्तमात्र,
उपयोगी ज्याचे त्याचे कर्तब आहे!
शेवटी आपणच दाबले जातो,
याच्यावरती शिक्कामोर्तब आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8154
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
20जानेवारी2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...