Thursday, January 12, 2023

जिजाऊ शपथ सांगतो...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

जिजाऊ शपथ सांगतो

तुम्ही मॉम आणि मम्मा झालात,
बापाचाही डॅडा करून ठेवला आहे.
आधुनिकतेच्या हौसेपोटी,
भलताच राडा करून ठेवला आहे.

सुविधा आल्या,सुबत्ता आली,
सुसंस्कार मात्र हरवत चालले आहेत.
सिमेंटच्या बंगल्याभोवती,
संस्कारकेंद्र मिरवत चालले आहेत.

डॅडा व्हा, मम्मा व्हा,मम्मी व्हा,
यापुढेही अजून काय काय व्हा !
त्याअगोदर तुम्ही तुमच्या लेकारांचे,
फक्त संस्कारी बाप आणि माय व्हा!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6689
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
12जानेवारी2023
 

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...