about us

खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेलेले हा पहिला आणि एकमेव  ब्लॉगआहे.


सूर्यकांत डोळसे हे उभ्या महाराष्ट्राला सामाजिक भाष्यकार, लोकप्रिय कवी,प्रसिद्ध वात्रटिकाकार आणि ई-साहित्यिक म्हणून परिचित आहेत. त्याचबरोबर ते स्तंभलेखक,मुक्तपत्रकार,शिक्षक,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यकर्ते,पुरोगामी विचारवंत,परखड वक्ते आणि मराठीतील लोकप्रिय ब्लॉगर म्हणून ओळखले जातात.. गेल्या 15 वर्षांपासून दैनिक पुण्यनगरीच्या पहिल्या पानावर दररोज प्रकाशित होणारा चिमटा आणि दैनिक झुंजार नेताच्या पहिल्या पानावर गेले 20 वर्षे दररोज आणि अखंडपणे प्रसिद्ध होणारा फेरफटका या वात्रटिका स्तंभांनी तर इतिहासाच घडविला आहे. आज महाराष्ट्रात आणि मराठीत त्यांचा कोट्यावधींचा हक्काचा असा वाचकवर्ग तयार झालेला आहे.त्यांच्या वात्रटिकांची लोक आवर्जून वाट बघत असतात.त्यांचे अनेक  कॉलम्स गाजलेले आहेत. खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेल्या पहिल्या आणि एकमेव ऑनलाईन साप्ताहिकाचे ते संपादक आहेत.तसेच त्यांचे अनेक ब्लॉग्ज आज लोकप्रिय आहेत. त्यांच्या आजपर्यंत १७ हजारांहून जास्त वात्रटिका प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांचे ३४वात्रटिकासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या व्याख्यानांचे अनेक कार्यक्रम शाळा,महाविद्यालये,विविध सामाजिक संस्था,क्लब्समधून गाजलेली आहेत,गाजत आहेत. त्यांच्या व्याख्यानांचे.... १) राजे चला तुम्हांला तुमचा महाराष्ट्र दाखवतो... २) काय होते बाबासाहेब... ३) होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय... ४) तुकोबा या नाठाळांच्या माथी काठी हाणा.... ५) सूर्यकांती ६)चेंडूची फुले आदी कार्यक्रम आज महाराष्ट्रात गाजत आहेत. सूर्यकांत डोळसे यांची शैक्षणिक पात्रता एम..ए.एम.एड,जरनॅलिझमअशी आहे. आयुष्यात कोणताही शासकीय अथवा अशासकीय पुरस्कार न घेण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे.

बिहार पॅटर्न .... मराठी वात्रटिका

  आजची वात्रटिका --------------------- बिहार पॅटर्न जसे कर्म तसे फळ, हे लगेच प्रत्यक्षात आले. महाराष्ट्रात जे कमावले, ते बिहारमध्ये गमावले ग...