Tuesday, March 10, 2026

पुतळ्यांची लाट ....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------------
पुतळ्यांची लाट
माहित नाही नेमकी कोणती,
अस्मिता लोक जागवू लागले ?
वाट्टेल तसे,वाट्टेल तिकडे,
अचानक पुतळे उगवू लागले.
पुतळ्यांचीच पुतळ्यांशी,
भर चौका चौकात गाठ आहे !
अनाधिकृत पुतळ्यांची,
जिकडे तिकडे लाट आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 100
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
10 मार्च 2026

 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...