आजची वात्रटिका
----------------------------
चलती का नाम....
जिकडे बघावे तिकडे,
राजकीय दृश्य सारखे आहे.
त्यांचे त्यांनाच कळेना,
कोण आपले?कोण परके आहे?
ज्याला आपले म्हणायला जावे,
नेमका त्याच्याकडूनच दगा आहे.
श्रद्धा आणि विश्वासाचा,
सगळ्याच बाजूने भुगा आहे.
ज्याच्या त्याच्या मनात शंका,
ज्याच्या त्याच्या मनात अढी आहे!
पक्षीय राजकारण म्हणजे,
चलती का नाम गाडी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9205
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
2 मार्च 2026
Subscribe to:
Post Comments (Atom)
नामांतराची टूम....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------- नामांतराची टूम कुठे नामविस्ताराचा तोडगा, कुठे नामांतराचे खुसपट आहे. ज्याचे दिले गेले नाव, त्याची हकनाक घ...
-
आजची वात्रटिका ------------------------- सुज्ञास सांगणे न लगे... वाट्टेल त्याला;वाट्टेल तसे, गुळाचे गणपती पावायला लागले. उरले सुरले भक्तही म...

No comments:
Post a Comment