Saturday, March 28, 2026

नॉन स्टॉप बाबागिरी....आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका
-----------------------------
नॉन स्टॉप बाबागिरी
अनेक बाबा बुवांचे भांडे फुटूनही
बाबागिरी थांबल्याचे उदाहरण नाही.
जोपर्यंत बिनडोक भक्त आहेत,
तोपर्यंत बाबागिरीला मरण नाही.
भक्त सलामत तो बाबागिरी जोरात,
हा तमाम बाबा बुवांचा नारा आहे !
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये,
हा तमाम बाबा बुवांचा तोरा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 116
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
28मार्च 2026

 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...