Saturday, March 21, 2026

साहित्यिक राजकारण .....साप्ताहिक वात्रटिका ,साप्ताहिक सरकारनामा

साप्ताहिक
वात्रटिका
--------------------------------
साहित्यिक राजकारण
साहित्यिकांसारखे साहित्यिक,
संस्थांमध्ये लोकशाही उजवू लागले.
साहित्यिकांसारखे साहित्यिक,
राजकीय नेत्यांनाही लाजू लागले.
कुणाच्या कुरवाळल्या जातात दाढ्या,
कुणा कुणापुढे गोंडेही घोळले जातात.
राजकीय निवडणुकीतले डावपेच,
साहित्यिकांमध्येही खेळले जातात.
राजकीय निवडणुकात चालणारे,
साहित्यिक निवडणूकांताही चालते आहे !
याचा शोध मात्र तुम्हीच लावा,
इथे खोक्यांचीही भाषा कोण बोलते आहे?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा
वात्रटिका - 79
वर्ष- दुसरे
21 मार्च 2026

 

No comments:

राजकीय किडा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- राजकीय किडा टोकरत राहतो;पोखरत राहतो, असा राजकीय किडा असतो. कधी अंतर्गत, कधी बाहेर, त्याचा राडा एके...