Saturday, March 28, 2026

अवतारी पुरुष?.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------------

अवतारी पुरुष?

अन्याय अत्याचार आणि शोषणाचे,
आकड्यावर आकडे फुगू लागले.
सगळेच्या सगळे अवतारी पुरुष,
योगायोगाने बलात्कारी निघू लागले.

योगाकडून योगाकडे नाही तर,
भोगाकडून भोगाकडे वाटचाल आहे.
आपल्या कुकर्माच्या बचावासाठी.
चक्क अवतारी पुरुषत्वाची ढाल आहे.

अवतरी पुरुष ते बलात्कारी पुरुष,
दुर्दैवाने हे ढळढळीत सत्य आहे !
ते म्हणती त्याला कृष्ण लीला,
मात्र हे तर त्यांचे कृष्ण कृत्य आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9230
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
28मार्च 2026
 

No comments:

नॉन स्टॉप बाबागिरी....आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- नॉन स्टॉप बाबागिरी अनेक बाबा बुवांचे भांडे फुटूनही बाबागिरी थांबल्याचे उदाहरण नाही. जोपर्यंत बि...