Wednesday, March 25, 2026

तारणहार....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
तारणहार
जे सापडले नाहीत ते सच्चे,
जे सापडले तेच फक्त भोंदू आहेत.
बुवा बाबा कोणतेही असले तरी,
ते एकमेकांचे सख्खे बंधू आहेत.
कुणाला अंधभक्तांचा तर,
कुणाला राजकीय आसरा आहे.
अंधभक्तांचे दिवाळे काढणे,
भोंदूसाठी दिवाळी आणि दसरा आहे.
अंध भक्त आणि राजकारणी,
सगळ्या भोंदू बाबाला शरण आहेत !
इथून तिथून सगळ्यांचेच मेंदू,
भोंदू बाबांच्या पायी तारण आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9227
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
25मार्च 2026

 

No comments:

तफावत...आजची वात्रटिका ....दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ---------------------------- तफावत गावाकडचे भोंदू बाबा, कोंबड्या बकरे मोजीत आहेत. शहरातल्या भोंदू बाबांचे, धंदे मात्र प्रचंड ...