Saturday, September 30, 2023

दैनिक वात्रटिका30सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 117वा दैनिक वात्रटिका30सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 117वा


दैनिक वात्रटिका
30सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 117वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

भूकंपाचे अवमूल्यन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

भूकंपाचे अवमूल्यन

कधी या पक्षाला भूकंपाचे धक्के आहेत,
कधीत्या पक्षाला भूकंपाचे धक्के आहेत.
भूकंप काही सावत्र नाहीत,
भूकंक जुळे आणि सख्खे आहेत.

लोकशाही आणि मतदारही,
आता शॉकप्रूफ झाले आहेत !
सततच्या धक्क्यांळे भूकंपलाही,
हल्ली वाईट खूपच दिवस आले अहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3 रे
30सप्टेंबर2023
 

घर देता का घर?...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

घर देता का घर?

मराठी माणसाच्या अस्मितेला,
मुंबईत घरघर लागली आहे.
कुणाकुणाला वाटू शकते,
ही तर अस्मितेची चुगली आहे.

आपण मराठी असल्याची,
मुंबईतच अडचण काहो आहे?
कुणी घर..देता का घर...?
मराठी माणसाचाच टाहो आहे.

थेट मराठी अस्मितेशीच,
हा परप्रांतीयांचा पंगा आहे !
मराठी माणूस मुंबईतच उपरा,
ही तर उलटी गंगा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8367
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
30सप्टेंबर2023
 

Friday, September 29, 2023

दैनिक वात्रटिका29सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 116वा


दैनिक वात्रटिका
29सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 116वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

गणपती विसर्जन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गणपती विसर्जन

गणपतीचे विसर्जनाचे सोहळे,
अनेकांच्या जीवावर बेतले जातात.
गणपतीला निरोप देता देता,
अनेकांकडून निरोप घेतले जातात.

बाप्पा पुढच्या वर्षी येतातही,
पण जे गेले ते कधीच येत नाहीत.
अपघात अपघात असले तरी,
हलगर्जीपणाशिवाय होत नाहीत.

विचारसंहिता आणि आचारसंहिता,
कोणताच भक्त का पाळू शकत नाही?
अतिउत्साह आणि हलगर्जीपणा,
प्रत्यक्ष विघ्नहर्ताही टाळू शकत नाही !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3 रे
29सप्टेंबर2023
 

Thursday, September 28, 2023

कागदी घोडे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

कागदी घोडे

योजना कोणतीही असो,
तिला कागदी घोडे जातात.
प्रत्यक्ष अंमलबजावणीवाले,
तसे फारच थोडे असतात.

कागदोपत्री योजना,
फक्त फायलींना भार होतात !
कागदी घोडे लावले की,
योजनाही त्याच्यावर स्वार होतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3रे
28सप्टेंबर2023
 

दैनिक वात्रटिका28सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 115वा


दैनिक वात्रटिका
28सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 115वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

उलटी गंगा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

उलटी गंगा

थोरामोठ्यांच्या गणपती दर्शनाला,
सेलिब्रिटी लोकांची धाव असते.
सेलिब्रिटींची होती मिरवणूक,
गणपतीचे तर फक्त नाव असते.

सेलिब्रिटी बरोबर गणपतीही
टीव्हीवरती झळकला जातो !
थोरामोठ्यांच्याच नावानिशी,
गणपती बाप्पा ओळखला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8366
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
28सप्टेंबर2023
 

Wednesday, September 27, 2023

दैनिक वात्रटिका27सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 113वा

दैनिक वात्रटिका
27सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 113वा
अंक डाऊनलोड लिंक -https://drive.google.com/file/d/1Am8NL7zikLfGAMW1PFNovH8T5WIrVJP3/view?usp=drivesdk


आजची वात्रटिका
-------------------------
चमत्कार
गणपतीच्या नावावरती,
अनेक चमत्कार घडवून झाले,
गणपतीला दूध पाजल्यानंतर,
आता तर गणपतीला रडवून झाले.
कुठे पावतोय नवसाला,
कुठे मदतीला धावतो आहे !
भक्तांच्या चमत्कारीक भक्तीने.
बुद्धीदाताही चक्रावतो आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3रे
27सप्टेंबर2023

 

दबाव तंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
दबाव तंत्र
शिकाऱ्याला शिक्षा आहे,
भिकाऱ्याला भिक्षा आहे.
सवयीच्या गुलामांना तर,
गुलामीचीच दीक्षा आहे.
मुजाऱ्यांचे हुजरे आहेत,
बाजारबसविला गजरे आहेत.
निलाजऱ्यांची संख्या मोठी,
थोडेफार लाजरे बुजरे आहेत.
जिथे स्वाभिमानाचा अभाव,
त्यांच्यावरतीच दबाव आहे !
साम-दाम-दंड-भेदाचा,
जिकडे तिकडे प्रभाव आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3रे
27सप्टेंबर2023

 

Tuesday, September 26, 2023

दैनिक वात्रटिका26सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..


दैनिक वात्रटिका
26सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 113वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

सिस्टीमचे वांधे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सिस्टीमचे वांधे

जे वाटतात पांढरेफेक,
त्यांचेच काळे धंदे आहेत.
खालच्यापेक्षाही वरचेच,
जास्तीत जास्त मिंधे आहेत.

मिंध्यांच्या आदेशाखाली,
खंदे खंदेही चेपलेले आहेत.
खंद्यांना बंदे करण्यासाठी,
सगळेच टपलेले आहेत.

मिंधे जसे अंधे आहेत,
तेही कुणाचे तरी बंदे आहेत!
सडलेल्या सिस्टीमचे,
इथेच तर सगळे वांधे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-83625
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
26सप्टेंबर2023
 

Monday, September 25, 2023

दैनिक वात्रटिका25सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 112वा


दैनिक वात्रटिका
25सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 112वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

उलट्या बोंबा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
उलट्या बोंबा
आपल्या भारतीय लोकशाहीचा,
बघा काळ कशी परीक्षा घेतो आहे ?
लोकशाहीच्या रक्षण कर्त्यांकडूनच,
लोकशाहीचा गळा दाबला जातो आहे.
लोकशाही वाचवा;लोकशाही वाचवा,
अशा उलट्या बोंबा मारल्या जातात.
चक्क लोकशाहीच्या मार्गानेच,
लोकशाहीला खडे चारल्या जातात.
लोकशाही स्वार्थाला आडवी येताच,
तिच्याच विरोधात सारे असतात !
लोकशाही नाकारणाऱ्यांकडूनच,
लोकशाही जिंदाबादचे नारे असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3रे
25सप्टेंबर2023

 

Sunday, September 24, 2023

दैनिक वात्रटिका24सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 111वा


दैनिक वात्रटिका
24सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 111वा 
अंक डाऊनलोड लिंक -

 

फरपट...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

फरपट

खाजवून खरुज आणावी तसे,
जिथे तिथे राजकारण आणले जाते.
राजकारणाशिवाय गत्यंतर नाही,
सगळ्यांकडून असेच मानले जाते.

एकदा राजकारण घुसले की,
त्याच्याच कलाने घ्यावे लागते !
राजकारण जिकडे ओढेल,
तिकडेच फरफटत जावे लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8364
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
24सप्टेंबर2023
 

Saturday, September 23, 2023

दैनिक वात्रटिका23सप्टेंबर2023.. तिसरे..अंक - 110वा


दैनिक वात्रटिका
23सप्टेंबर2023.. तिसरे..
अंक - 110वा 
अंक डाऊनलोड लिंक -

बदलते राजकारण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बदलते राजकारण

कालचे प्यादे आणि वजीर,
आजचे चक्क राजे झाले.
बदलत्या राजकारणात,
कालचे उंचच खुजे झाले.

बदलत्या राजकारणाची,
हीच बदलती दिशा आहे.
म्हणूनच तर राजकारण,
वाढत जाणारी नशा आहे.

वजीर आणि राजांची,
सगळीकडून नाकाबंदी आहे !
बदलते राजकारण म्हणजे,
प्याद्यांसाठी संधी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8363
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
23सप्टेंबर2023
 

राजकीय गुणवत्ता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
राजकीय गुणवत्ता
भारतीय लोकशाहीवरती,
बघा कसली वेळ आत्ता आलीआहे ?
राजकीय पक्ष काढाकढीपेक्षाही,
पक्ष फोडाफोडीच गुणवत्ता झाली आहे.
याचा पक्ष फोडा;त्याचा पक्ष फोडा,
हाच सत्ता स्थापनेचा शॉर्टकट आहे !
जो जास्तीत जास्त पक्ष फोडू शकतो,
आज त्याचाच राजकारणात वट आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6926
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
23सप्टेंबर2023
---------------------------

Friday, September 22, 2023

दैनिक वात्रटिका22सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 109 वा

दैनिक वात्रटिका

22सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..

अंक - 109 वा 

अंक डाऊनलोड लिंक -

https://drive.google.com/file/d/157pkZX4bhjSl6xWFVBVRVJaFOqzUr_OA/view?usp=drivesdk

नारीशक्ती वंदन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

नारीशक्ती वंदन

महिला आरक्षणाच्या निमित्ताने,
संसदेचे नारीशक्तीला वंदन आहे.
आरक्षण विधेयक मंजूर तरी,
त्याला 2029 पर्यंत चंदन आहे.

संसदेमध्ये महिलांसाठी,
आरक्षणाचे प्रमाण 33टक्के आहे.
त्याला आगामी जनगणनेची बाधा,
एवढे मात्र अगदी पक्के आहे.

महिला आरक्षणाच्या विधेयकाची,
ही सत्तावीस वर्षांची लढाई आहे!
या विधेयकाच्या श्रेयासाठी तर,
नेहमीप्रमाणे सगळ्यांची बढाई आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8362
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
22सप्टेंबर2023
 

कर्मवीर अण्णा ऐकलेत का?...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

कर्मवीर अण्णा ऐकलेत का?

कर्मवीर अण्णा ऐकलेत का?
तुमच्यापेक्षा उलटे व्हायला लागले.
देणगी देणाराच्या बापाचे नाव,
हे सरकारी शाळांना द्यायला लागले.

एकवेळ माझ्या बापाचे नाव बदलीन,
पण शिवरायांचे नाव बदलणार नाही.
तुमच्या ह्या करारी बाण्याची सर,
आज इथे कुणालाही येणार नाही.

तुम्ही 'कमवा आणि शिका' म्हणालात,
हे 'शिकवा आणि कमवा' म्हणू लागले!
शाळांची दत्तक योजना,
जणू त्यासाठीच प्रत्यक्षात आणू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6925
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -22सप्टेंबर2023
 

Thursday, September 21, 2023

दैनिक वात्रटिका21सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 108 वा


दैनिक वात्रटिका
21सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 108 वा 
अंक डाऊनलोड लिंक -
 

ज्याचा त्याचा इरादा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

ज्याचा त्याचा इरादा

राजकारणी राजकारण करतात,
मार्केटवाले मार्केटिंग करू लागतात.
सण आणि उत्सव आले की,
आनंदाने डांग डिंग करू लागतात.

आपले इरादे नेक असोत वा फेक,
ते उघड उघड पेश केले जातात !
सण असोत की उत्सव?
सगळ्यांकडूनच कॅश केले जातात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8361
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
21सप्टेंबर2023
 

हेलिकॉप्टर म्हणाले जेसीबीला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

हेलिकॉप्टर म्हणाले
जेसीबीला

कशासाठी झाली आपली निर्मिती?
आपल्या वाट्याला हे काय आले?
तू घालीत बसतोस हारावर हार,
मी उधळतो आकाशातून फुले.

ते वाढवितात आपापली किंमत,
आपले मात्र अवमूल्यन होत आहे !
ते साजरा करतात जल्लोष,
जो तो आपला गैरफायदा घेत आहे.

तुला डोंगर पोखरायला लावून,
चक्क उंदीर काढावा लागतो आहे!
मीसुद्धा घिरट्या घालीत घालीत,
अवमूल्यनाचा शाप भोगतो आहे !!,

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6924
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -21सप्टेंबर2023
 

Wednesday, September 20, 2023

दैनिक वात्रटिका20सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 107 वा



दैनिक वात्रटिका
20सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 107 वा
अंक डाऊनलोड लिंक -
 

महिला आरक्षण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

महिला आरक्षण

खरे तर महिला आरक्षणाचे,
नाव मोठे लक्षण खोटे आहे.
कागदोपत्री असले तरी,
प्रत्यक्षात लाभ कुठे आहे ?

महिला आरक्षणाचा खेळ
फक्त कागदावारी दिसतो !
महिला फक्त नावाला,
दुसराच कुणी कारभारी असतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8360
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
20सप्टेंबर2023
 

आमच्या पप्पांनी गणपती आणला....

आजची वात्रटिका
-------------------------

आमच्या पप्पांनी
गणपती आणला....

गणेशोत्सव 2023 प्रसंगी,
प्रत्येकच शब्द परवलीचा बनला.
जो तो ठेक्यात गातो आहे,
आमच्या पप्पांनी गणपती आणला.

गाण्याच्या ठेक्यावरती थिरकणारा,
जसा बाल आहे,तसा वृद्ध आहे.
आपल्याला शोभते की नाही?
याची कुठे कुणाला शुद्ध आहे?

आमच्या पप्पांनी गणपती आणला,
पप्पांच्या पप्पांच्याही ओठी असते !
प्रसार माध्यमांनी सिद्ध केले,
अस्सलपेक्षाही नक्कल मोठी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6923
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -20सप्टेंबर2023
 

Tuesday, September 19, 2023

दैनिक वात्रटिका19सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 106 वा

दैनिक वात्रटिका
19सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 106 वा
अंक डाऊनलोड लिंक -



 

आरक्षण युद्ध...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

आरक्षण युद्ध

आरक्षणाच्या मागणीसाठी,
जे ते कंबर कसून सिद्ध झाले.
आरक्षण केवळ मागणी नाही,
आता तर आरक्षण हे युद्ध झाले.

आरक्षणाच्या युद्धासाठी,
कुणी जास्तच कडवे होऊ लागले
युद्ध जिंकता जिंकता,
तहनामेच आडवे येऊ लागले.

आरक्षणाच्या मागणीसाठी,
आता साम-दाम-दंड-भेद आहेत !
वारंवार हेच सिद्ध होत झालेय,
न कर्त्याला शनिवारचे वेध आहेत !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8359
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
19सप्टेंबर2023
 

जुन्या संसद भवनाच्या आठवणी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
जुन्या संसद भवनाच्या
आठवणी
रथी पाहिले मी;महारथी पाहिले मी,
कसे सांगू किती किती पाहिले होते?
जसे सोन्याचे दिवस अनुभवले मी,
कसे सांगू मी किती साहिले होते ?
गुलामी पहिली; निलामी पाहिली,
मी स्वातंत्र्याच्या कळा सोसल्या होत्या.
कधी अभिमाननाने फुलली होती छाती,
कधी मला इंगळ्याही डसल्या होत्या.
जसे पोलादी इरादे पाहिले होते मी,
तसे मी प्रगतीचे पल्ले पाहिले होते.
अतिरेक्यांबरोबर माकडांचेही,
मी हल्ल्यांवरती हल्ले पाहिले होते.
जसे माझ्या हृदयी कमळ फुलले होते,
तसा माझ्या मनात मोर नाचला होता !
माझी सिंहमुद्रा बघून बघून,
जगापर्यंत योग्य संदेश पोचला होता !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6922
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19सप्टेंबर2023

 

Monday, September 18, 2023

दैनिक वात्रटिका18सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 105 वा


दैनिक वात्रटिका
18सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 105 वा
अंक डाऊनलोड लिंक -
 

जाहिरातींचे पोवाडे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

जाहिरातींचे पोवाडे

ज्यांनी पराक्रमाचे पोवाडे गायचे,
तेच शाहीर आरत्या गायला लागले.
शाहीर शाहीर राहिले नाही,
तेच दरबारी भाट व्हायला लागले.

पोवाड्यांच्या झाल्या जाहिराती,
जाहिरातींचे पोवाडे झाले आहेत!
जे जे गातात आरत्या,
त्यांनाच अच्छे दिन आले आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8358
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
18सप्टेंबर2023
 

लोकप्रिय वक्ते...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

लोकप्रिय वक्ते

जसे शब्द केवळ फेकता येतात,
तसे भाषणेही खूप ठोकता येतात.
पण आपले खरे आदर्श कोण?
हे मात्र कुठे त्यांना जोखता येतात?

काही भाषणं मवाळ असतात,
काही भाषणं तापट असतात.
मिठू मिठू बोलणारे तर,
निव्वळ पोपट एके पोपट असतात.

पोपटांबरोबरच पोपटपंचीलाही,
मार्केटमध्ये भाव आणि वाव आहे !
मार्केट जास्त असणारांचेच,
आज 'लोकप्रिय वक्ते' हे नाव आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6921
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18सप्टेंबर2023
 

Sunday, September 17, 2023

पॅकेज रिचार्जिंग ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

पॅकेज रिचार्जिंग

जुन्याच घोषणा;जुनीच आश्वासने,
लोकांनाही गृहीत धरले जाते.
पॅकेज जुने असले तरी,
त्यालाच नवे रिचार्ज मारले जाते.

सत्ताधारी कुणीही असले तरी
हाच राजमार्ग शोधला जातो!
जुनेच पॅकेज;नवी रिचार्जिंग,
राजकीय बॅलन्स साधला जातो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3
17सप्टेंबर2023
 

दैनिक वात्रटिका16सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..


दैनिक वात्रटिका
16सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
डाउनलोड लिंक -3

Saturday, September 16, 2023

दैनिक वात्रटिका16सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..अंक - 103 वा


दैनिक वात्रटिका
16सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 103 वा
अंक डाऊनलोड लिंक -
 

लोकवृत्ती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

लोकवृत्ती

लोक खऱ्याकडे पाठ करून,
खोट्याच्या पाठीशी असतात.
लोकांचे हे घातक अनुभव,
खऱ्याच्या गाठीशी असतात.

सत्य कितीही रुचले तरी,
सत्य लोकांना पचत नाही.
खोट्याच्या पाठराखणीशिवाय,
दुसरा मार्गच सुचत नाही.

खोट्याची पाठराखण करणे,
ही तर व्यवहारिक सोय असते!
खरे पोळते;खरे जाळते,
खोट्याच्या बाजूने होय असते!!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8357
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
16सप्टेंबर2023
 

Friday, September 15, 2023

दैनिक वात्रटिका15सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..


दैनिक वात्रटिका
15सप्टेंबर2023....वर्ष- तिसरे..
अंक - 102 वा
अंक डाऊनलोड लिंक -




 

पुरस्कारांचा व्यवहार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

पुरस्कारांचा व्यवहार

सरकारी काय?खाजगी काय?
पुरस्कार विकत भेटले जातात.
ज्याची खरेदीची ताकद आहे,
फक्त त्यालाच ते वाटले जातात.

कुणामुळे वाढते पुरस्काराची उंची,
कुणा -कुणामुळे उंची घटली जाते.
पुरस्कार देण्या घेण्याची मजा,
अगदी जगजाहीरपणे लुटली जाते.

एखादा पुरस्कार लाटला की,
पुरस्काराला पुरस्कार फुटू लागतात !
थोडेफार प्रामाणिक पुरस्कारही,
त्यांच्यामुळेच खोटे वाटू लागतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8356
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
15सप्टेंबर2023
 

आरक्षणाचे पेच...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

आरक्षणाचे पेच

मुकणारे आरक्षण वेगळे आहे,
टिकणारे आरक्षण वेगळे आहे.
आरक्षणाचे नवे प्रकार पडले,
याच्यामध्येच तर सगळे आहे.

आरक्षणाचा चेंडू तर,
कोर्टा-कोर्टात टोलवला जातो.
आरक्षणाच्या मृगजळामध्ये,
जो मागतो,तो भूलवला जातो.

एका आरक्षणाच्या लढ्यातून,
दुसरे लढे उभे राहू लागतात !
काल एकमेकांना साथ देणारे,
आज पाण्यामध्ये पाहू लागतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6920
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -15सप्टेंबर2023
 

दैनिक वात्रटिका27एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -325वा

दैनिक वात्रटिका 27एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -325वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1NoornI--tmMB-ZAcXYuN3...