Saturday, September 2, 2023

'इंडिया' चे सूत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

'इंडिया' चे सूत्र

जसे आघाडीने दाखवून दिले,
'इंडिया' मध्ये एकता आहे.
तसे आघाडीने दाखवून दिले,
'इंडिया' मध्ये अनेकता आहे.

इंडियाच्या ' लोगो ' वरूनच,
जो व्हायचा तोच बोध आहे.
इंडियाच्या भावी पंतप्रधानांची,
अजून तरी शोधा-शोध आहे.

कॉमन अजेंडा हेच,
'इंडिया'चे आघाडी सूत्र आहे !
आपल्या शत्रूचा शत्रू,
'इंडिया'च्या आघाडीचा मित्र आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6910
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
2सप्टेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...