Saturday, September 16, 2023

लोकवृत्ती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

लोकवृत्ती

लोक खऱ्याकडे पाठ करून,
खोट्याच्या पाठीशी असतात.
लोकांचे हे घातक अनुभव,
खऱ्याच्या गाठीशी असतात.

सत्य कितीही रुचले तरी,
सत्य लोकांना पचत नाही.
खोट्याच्या पाठराखणीशिवाय,
दुसरा मार्गच सुचत नाही.

खोट्याची पाठराखण करणे,
ही तर व्यवहारिक सोय असते!
खरे पोळते;खरे जाळते,
खोट्याच्या बाजूने होय असते!!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8357
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
16सप्टेंबर2023
 

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...