Tuesday, September 26, 2023

सिस्टीमचे वांधे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सिस्टीमचे वांधे

जे वाटतात पांढरेफेक,
त्यांचेच काळे धंदे आहेत.
खालच्यापेक्षाही वरचेच,
जास्तीत जास्त मिंधे आहेत.

मिंध्यांच्या आदेशाखाली,
खंदे खंदेही चेपलेले आहेत.
खंद्यांना बंदे करण्यासाठी,
सगळेच टपलेले आहेत.

मिंधे जसे अंधे आहेत,
तेही कुणाचे तरी बंदे आहेत!
सडलेल्या सिस्टीमचे,
इथेच तर सगळे वांधे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-83625
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
26सप्टेंबर2023
 

No comments:

daily vatratika...29jane2026