Tuesday, September 12, 2023

सेम टू सेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सेम टू सेम

चित्रपट आणि राजकारण,
दोन्हीही खूपच इक्वल असतात.
चित्रपटाप्रमाणे राजकारणातही,
सिक्वल एके सिक्वल असतात.

चित्रपटात आणि राजकारणात,
जसे हिरो सोबत व्हिलन असतात.
तसे शेवट चांगला करण्यासाठी,
दोन्हीकडेही मनोमिलन असतात.

राजकारणात फिल्मी मसाला,
चित्रपटात डर्टी पॉलिटिक्स असते !
फादरच गॉडफादर असले की,
दोन्हीकडे घराणेशाही फिक्स असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6918
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -12सप्टेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...