Sunday, September 3, 2023

वन नेशन,वन इलेक्शन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

वन नेशन,वन इलेक्शन

आपलीच चॉईस आहे,
आपलेच सिलेक्शन आहे.
त्याच धोरणाचे नाव,
वन नेशन,वन इलेक्शन आहे.

जेंव्हा कधी हे धोरण,
अगदी प्रत्यक्षात घडेल.
निवडणूक खर्च वाचला तरी,
विरोधकांना महागात पडेल.

तोट्याचे आणि फायद्याचे,
दुहेरी विश्लेषण करावे लागेल !
वन नेशन,वन इलेक्शन झाल्यास,
कार्यकर्त्यांना उपाशी मरावे लागेल!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8345
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
3सप्टेंबर2023
 

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...