Friday, September 29, 2023

गणपती विसर्जन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

गणपती विसर्जन

गणपतीचे विसर्जनाचे सोहळे,
अनेकांच्या जीवावर बेतले जातात.
गणपतीला निरोप देता देता,
अनेकांकडून निरोप घेतले जातात.

बाप्पा पुढच्या वर्षी येतातही,
पण जे गेले ते कधीच येत नाहीत.
अपघात अपघात असले तरी,
हलगर्जीपणाशिवाय होत नाहीत.

विचारसंहिता आणि आचारसंहिता,
कोणताच भक्त का पाळू शकत नाही?
अतिउत्साह आणि हलगर्जीपणा,
प्रत्यक्ष विघ्नहर्ताही टाळू शकत नाही !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3 रे
29सप्टेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 305वा l पाने -57

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 305वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1VDZIPmnz1bKXOaj5nbZ...