Wednesday, September 6, 2023

क्वीट इंडिया?...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------


क्वीट इंडिया?

कुणी म्हणतो भारतात इंडिया आहे,
कुणी म्हणतो इंडियात भारत आहे.
इंडिया आणि भारत वेगळे आहेत,
कुणी अशीही विभागणी करत आहे.

कुणाच्या डोक्यात वळवळ आहे,
कुणाच्या पोटात मळमळ आहे.
जणू विरोधाला विरोध म्हणून,
क्वीट इंडियाची चळवळ  आहे.

हेतू आणि मतं अस्पष्ट असले तरी,
यातले राजकारण मात्र ठळक आहे !
सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा...
हीसुद्धा भारताचीच ओळख आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6914
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -6सप्टेंबर2023

 

No comments:

daily vatratika...3april2025