आजची वात्रटिका
-------------------------
महिला आरक्षण
खरे तर महिला आरक्षणाचे,
नाव मोठे लक्षण खोटे आहे.
कागदोपत्री असले तरी,
प्रत्यक्षात लाभ कुठे आहे ?
महिला आरक्षणाचा खेळ
फक्त कागदावारी दिसतो !
महिला फक्त नावाला,
दुसराच कुणी कारभारी असतो!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8360
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
20सप्टेंबर2023
Subscribe to:
Post Comments (Atom)
खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------- खोके आणि धोके खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे. खोक्या आणि धोक्याच...
-
आजची वात्रटिका ------------------------- सुज्ञास सांगणे न लगे... वाट्टेल त्याला;वाट्टेल तसे, गुळाचे गणपती पावायला लागले. उरले सुरले भक्तही म...

No comments:
Post a Comment