Monday, September 4, 2023

सॉफ्ट टार्गेट....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

सॉफ्ट टार्गेट

रोष कुणाचाही असला तरी,
तो प्रथम एस.टी.वर काढला जातो.
आगीने आग वाढत जावून,
एस.टी. वरचाच राग वाढला जातो.

जाळपोळ आणि दगडफेकीने,
आंदोलन जास्तच उग्र वाटले जाते.
कोणत्याही आंदोलकांकडून,
एस.टी.हेच सॉफ्ट टार्गेट गाठले जाते.

आंदोलन संविधानिक असले तरी,
संविधानिक मार्गच बदनाम होतो !
एस.टी.पेटली आणि फुटली की,
जन सामान्यांचा चक्का जाम होतो!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6912
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -4सप्टेंबर2023
 

No comments:

daily vatratika...3april2025