Wednesday, September 13, 2023

हवामान तज्ञ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
हवामान तज्ञ
पावसाचा अंदाज सांगायची,
ज्याला त्याला भलतीच हौसआहे.
स्वयंघोषित हवामान तज्ञांचा,
सर्वत्र पाऊसच पाऊस आहे.
पाऊस तो पाऊसच,
त्याचा तर कधीच नेम नसतो.
सगळ्या हवामान तज्ञांचा,
अंदाजसुद्धा कधीच सेम नसतो.
अंदाज हुकले आणि चुकले तरी,
जबाबदारीशी घेणे देणे नाही!
असले हवामान तज्ञ तर,
जगामध्ये कुठेच होणे नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6917
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -13सप्टेंबर2023

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...