आजची वात्रटिका
-------------------------
राजकीय आबादानी
कुणी राजकारण करू नका,
असे तोंडापूरते म्हटले जाते.
राजकारणाचे आग्या मोहोळ तर,
त्यांच्याकडूनच उठले जाते.
करणारे आणि नको म्हणणारे,
सर्वच राजकारण करू लागतात.
आपला राजकीय मतलब,
जसा जमेल तसा पेरू लागतात.
राजकीय मतलबाच्या पेरणीवर,
पंचवार्षिक पीक काढले जाते!
त्यांची होते राजकीय आबादानी,
समाजकारण मात्र सडले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6916
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -9सप्टेंबर2023
Subscribe to:
Post Comments (Atom)
खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------- खोके आणि धोके खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे. खोक्या आणि धोक्याच...
-
आजची वात्रटिका ------------------------- सुज्ञास सांगणे न लगे... वाट्टेल त्याला;वाट्टेल तसे, गुळाचे गणपती पावायला लागले. उरले सुरले भक्तही म...

No comments:
Post a Comment